Health Tips: एक महिना बटाटा खाणे सोडा, शरीरात दिसतील हे बदल

मुंबई: भारतीय जेवणांमध्ये बटाट्याचा(potato) वापर सर्वाधिक केला जातो. साधारण प्रत्येक भाजीमध्ये बटाटा हा असतोच. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की जर तुम्ही एक महिन्यापर्यंत बटाटा सोडला तर तुमच्या शरीरात काय बदल होतील.


जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला स्ट्रिक्ट डाएट फॉलो करावे लागेल. अशातच तज्ञही तुम्हाला बटाटा खाणे सोडून देण्याचा सल्ला देतात.


बटाट्यामध्ये मोठ्या संख्येने कॅलरीज असतात. जर तुम्ही याचे सेवन करत नसाल तर शरीरात फॅट वाढणार नाही. बटाट्यामध्ये स्टार्च असते जे ब्लड शुगर वाढ होऊ शकते. डायबिटीजच्या रुग्णांनी बटाटा खाणे बंद केले तर ब्लड शुगर स्तर नियंत्रणात आणू शकतात.


बटाटा कमी खाल्ल्याने शरीरात कार्बोहायड्रेटचे प्रमाणही कमी होईल. यामुळे मेटाबॉलिक आरोग्य चांगले राहील. बटाट्याने बनवलेले प्रोसेस्ड फूड जसे बटाटा चिप्स, फ्रेंच फ्राईजमध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम असते.


याच्या सेवनाने हाय बीपी आणि हृदयासंबंधी आजारांचा सामना करावा लागतो. दरम्यान, बटाट्यामध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन बी६, पोटॅशियम, फायबरसारखे पोषकतत्वेही असतात. जे शरीरासाठी गरजेची असतात.


डाएटमध्ये हे हटवण्याआधी याचा पर्याय शोधून ठेवा. याच्या जागी तुम्ही रताळे, फुलकोबी, शलगम अथवा केळ्याला डाएटमध्ये सामील करू शकता.

Comments
Add Comment

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे