Rituraj Singh Died : प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

छोट्या पडद्यावरील होता लोकप्रिय चेहरा


मुंबई : टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये (TV serials and films) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ऋतुराज सिंह (Rituraj Singh) यांचं मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या राहत्या घरीच मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.


ऋतुराज यांचा जवळचा मित्र अमित बहल याने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ऋतुराजच्या अचानक निधनाने धक्का बसला असल्याचे त्याने म्हटले. ते काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. स्वादुपिंडाच्या उपचारासाठी त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराच्या काही समस्या निर्माण झाल्या आणि त्यांचे निधन झाले असल्याचे अमित बहल याने सांगितले.



अनेक टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये केले होते काम


ऋतुराज यांनी ९० च्या दशकात झी टीव्हीवर 'तोल मोल के बोल' हा रिॲलिटी गेम शो होस्ट करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. १९९३ मध्ये झी टीव्हीवर त्याचा प्रसारित झालेला टीव्ही शो 'बनेगी अपनी बात'ही खूप गाजला. ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट’, 'लाडो 2' , ‘अदालत’, ‘दिया और बाती’ अशा अनेक शोमध्ये त्यांनी काम केलं होतं. ते रुपाली गांगुलीसह लोकप्रिय हिंदी मालिका ‘अनुपमा’मध्ये देखील झळकले होते.


याशिवाय त्यांनी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘सत्यमेव जयते २’, ‘थुनिवू’, ‘जर्सी’, ‘हम तूम और घोस्ट’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. जानेवारीत प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये ऋतुराज यांनी रफीक ही भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

Comments
Add Comment

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले