मुंबई : टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये (TV serials and films) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ऋतुराज सिंह (Rituraj Singh) यांचं मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या राहत्या घरीच मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
ऋतुराज यांचा जवळचा मित्र अमित बहल याने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ऋतुराजच्या अचानक निधनाने धक्का बसला असल्याचे त्याने म्हटले. ते काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. स्वादुपिंडाच्या उपचारासाठी त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराच्या काही समस्या निर्माण झाल्या आणि त्यांचे निधन झाले असल्याचे अमित बहल याने सांगितले.
ऋतुराज यांनी ९० च्या दशकात झी टीव्हीवर ‘तोल मोल के बोल’ हा रिॲलिटी गेम शो होस्ट करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. १९९३ मध्ये झी टीव्हीवर त्याचा प्रसारित झालेला टीव्ही शो ‘बनेगी अपनी बात’ही खूप गाजला. ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट’, ‘लाडो 2’ , ‘अदालत’, ‘दिया और बाती’ अशा अनेक शोमध्ये त्यांनी काम केलं होतं. ते रुपाली गांगुलीसह लोकप्रिय हिंदी मालिका ‘अनुपमा’मध्ये देखील झळकले होते.
याशिवाय त्यांनी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘सत्यमेव जयते २’, ‘थुनिवू’, ‘जर्सी’, ‘हम तूम और घोस्ट’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. जानेवारीत प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये ऋतुराज यांनी रफीक ही भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…