तुमची मुले सतत जंक फूड खातायत का? य़ा टिप्सने कमी करा ही सवय

मुंबई: सध्याची धावपळीची जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्याला घेरत आहेत. खराब खाण्यापिण्याचा परिणाम मुलांपासून ते मोठ्यांवरही होत आहे. मोठे असो वा लहान मूल सर्वांनाच जंक फूड खायला आवडते. मात्र हे चवीला चांगले लागणारे जंक फूड आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.


तुमच्याही मुलांना जंकफूड खाण्याची सवय आहे तर त्यापासून सुटका कशी मिळवाल यासाठी आम्ही तुम्हाला टिप्स देत आहोत. त्यासाठी तुम्हाला या टिप्स फॉलो कराव्या लागतील.



मुलांच्या खाण्यापिण्यात करा बदल


मुलांच्या खाण्यापिण्यात अचानक बदल करणे थोडे कठीण असते. अशातच मुलांमध्ये हळू हळू हेल्दी फूड खाण्याची सवय लावा. यामुळे योग्य प्रमाणात पोषकतत्वे त्यांना मिळतील.



मुलांच्या आवडीचे हेल्दी फूड


जर तुमच्या मुलाला हेल्दी फूड जसे भाजी खाणे आवडत नाही तर त्यात मसाले मिसळा. दही अथवा सॉससोबत त्याला खाण्यास द्या.



वेळेवर करा सुरूवात


मुलांच्या खाण्यापिण्यात खास बदल करा. सोबतच मुलाला जर समजावून समजत असेल तर त्याला सांगा की हिरव्या भाज्या खाल्ल्याने काय फायदे होतात.



डाएटमध्ये प्रोटीनचा करा समावेश


मुलांच्या खाण्यापिण्यात प्रोटीनचा अधिकाधिक समावेश करा. यामुळे एक्स्टा कॅलरीज वाचतील. सोबतच त्यांची जंक फूड खाण्याची इच्छा शांत होईल. दूध, अंडी, मासे, चिकन आणि धान्ये अधिकाधिक खा.



खाण्याची वेळ ठरवा


जेवणाची वेळ ठरवा. आठवड्याच्या हिशेबाने मेन्यू बनवा. यामुळे मुलांना दररोज वेगवेगळे पदार्थ खाण्यास मिळतील. त्यांना प्रोटीन तसेच पनीर खायला द्या.

Comments
Add Comment

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे