Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंची अवस्था गल्लीबोळातल्या नेत्यांसारखी!

मंत्री गुलाबराव पाटील यांची टीका


आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विधानसभा निवडणुकीचे चॅलेंज देणे हास्यास्पद : शंभूराज देसाई


मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना 'तुम्ही राजीनामा द्या, मी तुमच्या मतदार संघात येऊन निवडणूक लढवायला तयार आहे', असं थेट आव्हान दिल्यामुळे त्यांच्यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून जोरदार टीका होत आहे. मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी देखील आदित्य ठाकरेंवर सणसणीत टीका केली.


गुलाबराव पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्याकडे आता कोणतेही भांडवल शिल्लक राहिले नाही. गल्ली बोळातील नेत्यांसारखी त्यांची अवस्था झाली आहे. आता केवळ म्याव म्याव करण्याचे ते काम करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.



शंभूराज देसाईंची आदित्य ठाकरेंवर टीका


काल आदित्य ठाकरे यांची कोपरा सभा झाली. खूपच धाडसी विधान केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी, असे आश्चर्यकारक विधान उबाठा गटाचे युवराज यांनी केले. आदित्य ठाकरे यांच्या चार कोपरा सभा झाल्या, ज्याला दोनशे तीनशे लोक होती. स्वतःला उबाठा गटाचे युवराज समजणाऱ्यांच्या सभेला पाचशे लोकही येत नाहीत. आदित्य यांना जिंकण्यासाठी दोन विधान परिषदेच्या जागा द्याव्या लागतात आणि नंतर निवडणूक लढवावी लागते. त्यांनी विधानसभा लढवण्याचे चॅलेंज देणे हे हास्यास्पदच आहे, अशी टीका शंभूराज देसाईंनी केली आहे.


Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये