Monday, May 12, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

लग्नाच्या ३ वर्षांनी बाबा बनणार वरूण धवन, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

लग्नाच्या ३ वर्षांनी बाबा बनणार वरूण धवन, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

मुंबई: बॉलिवूड अभिनेता वरूण धवन लवकरच बाबा बनणार आहे. अभिनेत्याच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. पत्नी नताशा दलाल प्रेग्नंट आहे. ही खुशखबर वरूणने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आहे.


फोटोत वरूण, पत्नी नताशाच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये लिहिले, आम्ही प्रेग्नंट आहोत. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला हवेत. वरूण आणि नताशा यांचा फोटो रूममध्ये क्लिक करण्यात आला आहे. यात त्यांचा पेट डॉगही दिसत आहे.


 



 










View this post on Instagram























 

A post shared by VarunDhawan (@varundvn)





वरूण ३६ वर्षांचा आहे आणि बाबा बनत असल्यामुळे खूप खुश आहे. नताशा आणि वरूण यांच्या लग्नाला काही आठवड्यांपूर्वीच ३ वर्ष झाली आहेत. वरूणचे जेव्हा नताशाशी लग्न झाले तेव्हा प्रेग्नंसीबाबत अनेक बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या, मात्र नेहमी खोट्या ठरल्या.


आता वरूणने स्वत: चाहत्यांना ही बातमी दिली आहे आणि सर्वांना हैराण केले. अभिनेता आशा करत आहे की येणारे बाळ त्याच्यासाठी गुडविल घेऊन येईल. वरूण आणि नताशाला सिने इंडस्ट्रीमधील अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत सगळ्यात सुंदर शुभेच्छा अर्जुन कपूरने दिल्या आहेत. त्याने कमेंटमध्ये लिहिले, डॅडी आणि मम्मी नंबर १.


Comments
Add Comment