रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादी पक्षाचीच, कार्यकर्त्यांनी कामाला लागा-अजित पवार

रायगड(उदय कळस): ४३ कोटी रुपये खर्चाच्या म्हसळा शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपुजन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी खासदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे,जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष नाजीम हसवारे, मुसद्दीक इनामदार,तालुका अध्यक्ष समीर बनकर, मोहंमद मेमन, महादेव पाटिल, शामकांत भोकरे, जिल्हा महिला अध्यक्षा उमा मुंडे,नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, नगरपंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, तालुका महिला अध्यक्षा सोनल घोले, शगुफ्ता जहांगीर, बबन मनवे, असाल कादिरी,रियाज घराडे,शाहिद उकये, चंद्रकांत कापरे, जयश्री कापरे,सत्ताधारी पक्षाचे सर्व नगरसेवक आदि मान्यवर उपस्थित होते.


म्हसळा नगर पंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरीकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने खासदार सुनिल तटकरे,महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत म्हसळा नगर पंचायत म्हसळा शहरासाठी ४२.९२ कोटी इतक्या मोठ्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वाजता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.


यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तालुक्यातील विकास कामांचा पाढा वाचत तहसिल कार्यालयातील इमारत, नगरपंचायत इमारत साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आदिती तटकरे यांनी केली.आपले मनोगत व्यक्त करताना नाम.अजितदादा पवार यांनी सांगितले कि शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिव स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी ह्या छत्रपती शिवरायांच्या भूमीत राष्ट्रवादी पक्ष हा मोठ्याने वाढवला,त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते यांनी त्यांना भक्कम अशी साथ दिली म्हणून आज रायगड मध्ये आपल्या पक्षाची नाळ ही गावा-गावात जोडली गेली आहे.कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम सुनील तटकरे यांनी केले.लोकांचा असंख्य असा पाठींबा मिळवून ग्राम पंचायत,नगर पंचायत,नगर परिषद,जि.परिषद अश्या वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या चिन्हावर मिळविल्या.महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हिच्या पाठपुरवठ्यामुळे मतदार संघाचा विकास होत आहे.अनेक योजनांना तिच्या पाठपुरवठ्यामूळे गती मिळत आहे.


सरकार मध्ये असल्यामुळे अनेक योजनांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.आदिती तटकरे यांच्या कल्पनेच्या माध्यमातून मुलींना मोफत शिक्षण घेता यावे त्यांची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता येत नसल्यामुळे मुलींना मोफत शिक्षण घेण्या करीता वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या खालील मुलींना पुढील शिक्षण घेता येईल.त्यांनी शेवटी सांगितले कि रायगड लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला येणार असून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.यावेळी उबाठा चे शहर अध्यक्ष नगरसेवक अनिकेत पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.

Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला