तिशीच्या नंतर रोज प्या हा खास चहा, चेहऱ्याची चमक वाढवेल आणि सुरकुत्या होतील कमी

मुंबई: प्रत्येकाला असे वाटते की आपण नेहमीच तरूण आणि सुंदर दिसावे. मात्र जसजसे वय वाढत जाते तसतसे चेहऱ्याची चमक कमी कमी होत जाते. वाढत्या वयासोबतच त्वचेची चमक आणि सुंदरता कायम राहण्यासाठी बाहेरचे ब्युटी प्रॉडक्ट्स कामाला येत नाहीत. वय वाढण्यालोबतच तुम्हाला शरीर आणि त्वचेची देखभाल करण्यासाठी आपल्या डाएटवर खास लक्ष देणे गरजेचे आहे.


जर तुम्हाला दीर्घकाळ तरूण आणि सुंदर राहायचे आहे तर ३०च्या वयानंतर आपल्या खाण्यापिण्यात सुधारणा करा.तुम्हाला पोषण देणारा आहार घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही दिवसाची सुरूवात ग्रीन टीने करा. ग्रीनटीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक अशी तत्वे असतात जी त्वचेला निरोगी राखण्यात मदत करतात.


ग्रीन टी चेहऱ्याच्या त्वचेसाठी अँटी एजिंगचे काम करते. यामुळे वेळेआधी येणाऱ्या सुरकुत्या, फाईन लाईन्स या समस्या दूर होतात. यामुळे त्वचेत ओलावा कायम राखला जातो. तसेच त्वचेचा पोतही सुधारतो. यामुळे पोट हेल्दी राहते आणि मुरूमांचा त्रास होत नाही.


ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे तणाव रोखणे तसेच व वाढण्याचे संकेत कमी करण्यास मदत करतात.


यामुळे शरीराची सूज कमी होण्यास मदत होते. कारण यात आवश्यक इन्फ्लामेंट्री गुण असतात.


ग्रीन टी शरीराचे विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. यामुळे त्वचेची इलास्टिसिटी आणि रंग सुधारतो.

यामुळे यूव्ही किरणांपासून सुरक्षा मिळते. ग्रीन टीमुळे त्वचेवर अतिरिक्त तरंग येतो.


ग्रीन टी मुरूमे रोखण्याचे काम करते. यामुळे त्वचा साफ राखण्यास मदत होते.

Comments
Add Comment

मायग्रेन का होतो? आणि त्याचे सुरुवातीची लक्षणे काय आहेत?

मायग्रेन ही एक प्रकारची तीव्र डोकेदुखी आहे जी सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळी असते. त्यामुळे डोक्याच्या एका भागात

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर

Health : फिटनेस आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक, 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई: निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, स्नायूंची निर्मिती करायची असेल किंवा वजन कमी करण्याचे ध्येय असेल, तर