Healthy Tips: तुम्ही रात्री उशिरा जेवण करता का? तर वेळीच व्हा सावध

मुंबई: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत रात्री उशिरापर्यंत जागणे आणि उशिरा जेवणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र तुम्हाला ही सवय अनेक आजारांची शिकार बनवू शकते.


रात्री उशिरा जेवणाची सवय तुम्हाला अनेक आजार देऊ शकते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.



लठ्ठपणा


रात्रीच्या वेळेस आपले शरीर कमी कार्यरत असते. यावेळेस जेवलेले जेवण फार हळूहळू पचते. यामुळे कॅलरीज अधिक जमा होऊ लागतात. रात्री उशिरा जेवण केल्याने शरीरात फॅटचा स्तर वाढू शकतो यामुळे वजन वाढले आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.



टाईप २ डायबिटीज


शरीरासाठी रात्रीची वेळ आरामाची असते. यावेळेस शरीराची चयापचय क्रिया धीमी होते. रात्री उशिरा जेवण केल्याने इन्सुलिनचे स्त्राव व्यवस्थित होते नाही आणि यामुळे ब्लड शुगर लेव्हल असंतुलित होते.



हृदयरोग


रात्री उशिरा जेवण केल्याने शरीरात चरबीचा स्तर वाढतो. यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. यावेळेस जेवण पचण्याची क्षमता कमी होते. यामुळे चरबी वाढते.



अॅसिडिटी आणि जळजळ


रात्री उशिरा जेवल्याने पोटात अॅसिडचा स्तर वाढतो. यामुळे अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते.

Comments
Add Comment

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या