PM Modi: प्रत्येक श्वास म्हणतोय भारत-यूएई मैत्री जिंदाबाद- पंतप्रधान मोदी

अबूधाबी: पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांनी मंगळवारी संयुक्त अरब अमिरातमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करताना म्हटले की भारताला त्यांच्यावर गर्व आहे. ही वेळ दोन्ही देशांदरम्यानच्या मित्रतेचा जयकार आहे. अबूधाबीच्या जायद स्पोर्ट्स स्टेडियममध्ये मोदी मोदी असा नारा सुरू असताना पंतप्रधान मोदींनी अहलन मोदी कार्यक्रमात सामील झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांना अभिवादन करत नमस्कार म्हटले.


भारतीय समुदायाच्या या कार्यक्रमाने ते मंत्रमुग्ध झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही येथे इतक्या मोठ्या संख्येने येत इतिहास रचला. तुम्ही यूएईच्या विविध भागातून आणि भारताच्या विविध राज्यांतून जरी आले असलात तरी सर्वांची मने जोडलेली आहेत.


ही वेळ भारत आणि यूएईच्या मित्रतेच्या जयजयाकाराची आहे. या ऐतिहासिक स्टेडियममध्ये प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे भारत-यूएईची मित्रता जिंदाबाद.आजच्या या आठवणी माझ्यासोबत नेहमी राहतील कारण येथे मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी आलो आहे. मी १४० कोटीहून अधिक भारतीयांकडून, तुमच्या बहीण-भावांकडून हा संदेश घेऊन आलो आहे की भारताला तुमच्यावर गर्व आहे.


यावेळी पंतप्रधान मोदींनी २०१५मधील आपल्या पहिल्या यूएई दौऱ्याच्या आठवणी ताज्या केल्या. ते म्हणाले, तेव्हा आम्ही केंद्र सरकारमध्ये नवे होते. तीन दशकांमधील एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा होता. तेव्हा पासून गेल्या दहा वर्षात यूएईचा माझा सातवा दौरा आहे.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदी म्हणाले भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत बनवणार ही माझी गॅरंटी आहे. ते म्हणाले लवकरच यूएईमध्ये यूपीआय सुरू होणार आहे. आज २१व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात भारत आणि यूएईचे हे नाते अभूतपूर्व उंचीवर पोहोचले आहे. आम्ही एकमेकांच्या प्रगतीमध्ये साथीदार आहोत. आज यूएई भारताचा तिसरा मोठा ट्रेड पार्टनर आहे.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी