इंदौर : इंदौरमध्ये एका भीक मागणाऱ्या कुटुंबाने दिड महिन्यात तब्बल अडीच लाख रुपये कमावल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
इंद्राबाई या महिलेने आपल्या मुलांना जबरदस्तीने भीक मागायला लावले होते, अशी माहिती तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या महिलेची रवानगी कारागृहात झाली असून तिच्या सात वर्षाच्या मुलीला एनजीओमध्ये पाठवण्यात आले आहे.
९ फेब्रुवारी रोजी इंद्राबाई हिला तिच्या मुलीसोबत भीक मागताना पकडण्यात आले. अधिकाऱ्यांना तिच्याकडे १९,६०० रुपये आणि मुलीकडे ६०० रुपये सापडले. इंद्राबाईने अटकेच्या ४५ दिवसांत अडीच लाख रुपये कमावल्याचे उघड झाले.
“उपाशी राहण्यापेक्षा आम्ही भीक मागणे पसंत केले. चोरी करण्यापेक्षा हे चांगले आहे, असे तिने यावेळी म्हटले. तसेच राजस्थानमधील कोटाजवळ एक दोन मजली घर आणि शेतजमीन आहे. पती-पत्नी आणि पाच मुले, चांगला स्मार्टफोन वापरतात. तर, तिचा नवरा मोटारसायकलवरून फिरतो. सर्व काही भीक मागून कमावल्याचे तिने सांगितले.
इंद्राबाईला एकून पाच मुले असून तीने आपल्या मुलांना जबरदस्तीने भीक मागायला लावले. इंदूरच्या रहदारी असणाऱ्या भागात तसेच उज्जैन महाकाल मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर ती आपल्या मुलांना भीक मागायला लावत असे. मुलांना जबरदस्तीने भीक मागण्यास प्रवृत्त केल्याने पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.
सात वर्षांच्या मुलीशिवाय, इंद्राला १०, ८, ३ आणि २ वर्षे वयोगटातील इतर चार मुले आहेत. ती मोठ्या मुलांना इंदूरच्या व्यस्त लवकुश चौकात ठेवते. तेथून उज्जैन आणि महाकालच्या मंदिराकडे रस्ते जातात. इंद्राने पोलिसांना सांगितले की, तिने हे चौक निवडले कारण ते उज्जैनसाठी ट्रान्झिट पॉईंट होते. प्रार्थना करण्यासाठी जात असलेल्या यात्रेकरूंना भिक्षा मागणाऱ्या मुलांना आणि महिलांना दूर पळवून लावण्याची शक्यता नव्हती. महाकाल मंदिराच्या निर्मितीनंतर तिची कमाई वाढल्याचे तिने सांगितले.
दरम्यान, भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी इंदूर महानगरपालिकेसोबत काम करणारी स्वयंसेवी संस्था इंदूरच्या ३८ प्रमुख चौकांमधून सुमारे ७,००० भिकाऱ्यांची माहिती गोळा करत आहे, त्यापैकी ५० टक्के मुले आहेत. एनजीओ स्वयंसेविका रुपाली जैन यांनी सांगितले की, एका अंदाजानुसार एकत्रितपणे ते वार्षिक २० कोटी रुपये कमवतात.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…