Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये काँग्रेसला झटका, वरिष्ठ नेत्यांनी धरला भाजपचा हात

महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये काँग्रेसला झटका, वरिष्ठ नेत्यांनी धरला भाजपचा हात

मेहसाणा: लोकसभा निवडणुकीआधी साधारण प्रत्येक राज्यात काँग्रेस पक्षाला मोठमोठे झटके बसत आहेत. राज्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याची बातमी अद्याप शांत झालेली नसतानाच काँग्रेससाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी आमदारपदाचा राजीनामा देणाऱ्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये या नेत्याला त्या परिसरातील संकटमोचक असे म्हटले जाते. प्रदेश भाजपा अध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रामात माजी आमदार सीजे चावडा यांनी आपल्या समर्थकांसह औपचारिक पद्धतीने भाजपमध्ये प्रवेश केला.

गुजरातच्या बिजापूर येतून माजी आमदार चावडा यांनी १९ जानेवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सीजे चावडा बिजापूर येथून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येत होते. त्यांनी राज्य काँग्रेसच्या विविध पदांवर काम केले आहे. २०१९मध्ये ते लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांच्याविरोधात गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढले होते. तेथे ते ५.५७ लाख अंतरांच्या मतांनी हरले होते.

बीजापूरमध्ये नाथालाल पटेल यांनीही काँग्रेसचा हात सोडला होता. ते म्हणाले की जनतेची सेवा कऱण्यासाठी ते भाजपमध्ये सामील होतील. त्यांना पंतप्रधान मोदींच्या विकास यात्रेचा भाग बनायचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -