अंबड औद्योगिक वसाहतीत रिक्षा चालकाचा खून, अल्पवयीन संशयितासह तीन जण ताब्यात

सिडको (प्रतिनिधी) - गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी दारू पिण्याच्या वादातून खून झाल्याची घटना ताजी असतानाच अंबड औद्योगिक वसाहती जवळील चुंचाळे घरकुल योजना भागात एका रिक्षा चालकाने किरकोळ कारणावरून दुसऱ्या रिक्षा चालकाचा खून केला आहे याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तीन न जणांना ताब्यात घेतले असून शंकर गाडगीळ वय 38 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.


याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की चुंचाळे घरकुल योजना भागात शनिवारी दिनांक 10 रोजी रात्री दहा वाजून तीस वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून संशयित रिक्षा चालक सोनू कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन यांनी शंकर गाडगीळ यांच्या डोक्यात दांडूका मारल्याने गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमी गाडगीळ याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.


या प्रकरणी चुंचाळे अंबड औद्योगिक वसाहत पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार ढाकणे व पथक यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ संशयित रिक्षा चालक सोनू कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन या तिघांना ताब्यात घेतले आहे. मयत व संशयित आरोपी हे चुंचाळे घरकुल भागात राहणारे आहेत. गाडगीळ व कांबळे हे दोघेही रिक्षा चालक आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या