U19 WC 2024: ६ महिन्यांच्या आत दुसऱ्यांदा वर्ल्डकप फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने

मुंबई: अंडर १९ वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला १ विकेटनी हरवले. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयी संघर्षाने खेळताना पाकिस्तानला चीत केले. सोबतच भारतासोबत फायनल खेळण्यासाठी आपले स्थान पक्के केले.


आता ११ फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकपचा फायनल सामना रंगणार आहे. ६ महिन्यांच्या आत हे दुसऱ्यांदा घडतेय जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या स्पर्धेच्या फायनलमध्ये भिडत आहे.


गेल्या वेळेस पुरुष वर्ल्डकप २०२३मध्ये दोन्ही संघादरम्यान फायनलचा सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने बाजी मारली होती. त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी अंडर १९ संघाकडे आहे.



गेल्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय


वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये भारताचा वरिष्ठ पुरुष गट आणि ऑस्ट्रेलियाचा वरिष्ठ पुरुष गट यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. दोन्ही संघादरम्यान हा सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला होता. या साम्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली होती. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत ५० षटकांत २४० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ट्रेविस हेडच्या शानदार शतकाच्या जोरावर ४ विकेट गमावत पूर्ण केले होते.


आता ११ फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा वर्ल्डकपमध्ये आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघ अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आहेत. भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे भारतीय संघ फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवत २०२३च्या वर्ल्डकपचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख