Saif and Kareena : स्टारकिड्सबाबत प्रश्नावर सैफ आणि करीना भडकले! म्हणाले, 'आम्ही मुलांना जन्म देतो, पण...

त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा


मुंबई : बॉलिवूडच्या नेहमीच चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी (Bollywood couples) एक म्हणजे सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूरची (Kareena Kapoor Khan) जोडी. तैमूर (Taimur) आणि जेह (Jeh) या त्यांच्या मुलांचीही सोशल मीडियावर (Social Media) कायम चर्चा होत असते. त्यांचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज पापाराझी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि ते काही मिनिटांतच व्हायरल होतात. यासंबंधीच सैफ आणि करिना यांना नुकताच एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी दिलेल्या उत्तराने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.


तुमच्या आडनावाचा तुमच्या करिअरवर परिणाम होतो का? असा प्रश्न अनुपमा चोप्रा यांनी सैफ अली खान आणि करिनाला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना सैफ म्हणाला, "प्रेक्षक हे स्टारकिड्समध्ये (Starkids) खूप इंटरेस्टेड असतात. स्टारकिड्सचे लोक सतत फोटो काढत असतात."


पुढे करिना म्हणाली, "तैमूर हा एकदा तायक्वांदोसाठी गेला होता. तिथे लोक त्याचे फोटो काढत होते, इंटरनेटवर त्याचे रील शेअर केले जात होते. आम्हाला असे अटेंशन नको आहे. आम्ही स्टारकिड्स बनवत नाही. आम्ही मुलांना जन्म देतो. पण प्रेस, फोटोग्राफर्स आणि जनता त्या मुलांना 'स्टारकिड्स' बनवतात. जनतेला कदाचित निष्पापपणे फक्त स्टारकिड्स बघायचे असतात."


सैफ म्हणाला, "फक्त प्रसिद्ध आडनाव असल्याने तुम्ही टॅलेंटेड होऊ शकत नाही." त्याने तैमूरबाबत सांगितलं की, "तैमूरला अर्जेंटिनाचा लीड गिटारवादक किंवा फुटबॉलपटू व्हायचे आहे. त्याला अर्जेंटिनाला जायचे आहे जेणेकरून तो फुटबॉलपटू बनू शकेल." त्यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.


Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व