Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचं १५ फेब्रुवारीला विशेष अधिवेशन

कोणते निर्णय होण्याची शक्यता?


मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात गाजत असलेला मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा अजूनही पूर्णपणे निकालात निघालेला नाही. राज्य सरकारने (Maharashtra Government) मराठा समाजाच्या (Maratha Samaj) सर्व मागण्या मान्य करण्याचे कबूल केले असले तरी त्यासंबंधी अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही.


अनेक आंदोलनं, मोर्चे, उपोषण, कोर्टकचेऱ्या आणि शासन निर्णयानंतरही समाधान न झाल्याने मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारनेही वेगाने हालचाल करायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने १५ फेब्रुवारी रोजी एका दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष अधिवेशनामध्ये मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडून तो स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. तसेच आरक्षणाबाबतचं विधेयकही या आधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.


मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यावे ही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई असा महामोर्चाही काढला होता.


त्यानंतर कुणबी नोंदी आढळलेल्या मराठा व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांना पितृसत्ताक कुटुंबपद्धतीनुसार कुणबी दाखले देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली होती. तशी अधिसूचनाही प्रसिद्ध झाली आहे. मात्र राज्य सरकारकडून अध्यादेश न निघाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा दिला. त्या पार्श्वभूमीवर या राज्य सरकारने बोलावलेल्या अधिवेशनात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या