MNS BJP Alliance : भाजप मनसे युती होणार? मनसेच्या तीन प्रमुख नेत्यांनी घेतली देवेंद्रजींची भेट!

काय आहे या भेटीमागचे कारण? राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चांना उधाण


मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ आल्या असतानाच आता राज्यासह देशभरातल्या राजकारणात प्रचंड उलथापालथी होत आहेत. प्रत्येक राज्यात भाजपची (BJP) ताकद वाढत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातही भाजपची साथ दिलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) अधिकृतपणे राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाचा (NCP symbol) ताबा मिळाला. परिणामी भाजपचीच ताकद अधिक वाढली आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्व असलेला मनसे (MNS) पक्षही भाजपला साथ देणार अशी चर्चा रंगली आहे. मनसेच्या तीन प्रमुख नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात भाजप-मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.


मनसेचे तीन नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar), नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याचे समोर आले आहे. या भेटीचं नेमकं कारण काय, भाजप आणि मनसे युतीचा प्रस्ताव हे या भेटीमागचं गुपित आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.


मागील काही दिवसांत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस अनेकदा एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मनसे-भाजप यांच्या युतीबाबत अनेकदा चर्चा झाली. सोबतच भाजपच्या नेत्यांनी देखील अनेकदा राज ठाकरेंची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. अशात आता मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगांवकर आणि नितिन सरदेसाई यांनी फडणवीसांची गुप्त भेट घेतल्याने भाजप- मनसेमध्ये युती होणार का? याबाबत चर्चा होत आहे.



फडणवीसांसोबतची ती सदिच्छा भेट : संदीप देशपांडे


दरम्यान याच भेटीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आमची विशेष अशी काही चर्चा झाली नाही. बऱ्याच दिवसांपासून फडणवीसांना भेटायचं होतं. त्या दृष्टीने आम्ही तिघांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे ती एक फक्त सदिच्छा भेट होती. तसेच पुढेही प्रसंग आल्यास अशा सदिच्छा भेटी नक्कीच होतील. आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो, तर प्रत्येक वेळी त्याचा काहीतरी अर्थ काढला पाहिजे असे नाही. एकमेकांना भेटणं महाराष्ट्राचा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील राज ठाकरे यांना येऊन भेटतात. त्यामुळे आम्ही देखील त्यांना भेटलो', असं देशपांडे म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम