Landslide : हरिश्चंद्रगडावर दरड कोसळली; चार पर्यटक गंभीर जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

हरिश्चंद्रगडावर दरड कोसळली; चार पर्यटक गंभीर जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक


अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ (Tourist Destination) असलेल्या हरिश्चंद्रगडावर रविवारी मोठी दुर्घटना घडली. सुट्टीचा दिवस असल्याने गडावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. दरम्यान, गडावरून खाली उतरत असताना आडव्या कड्याजवळ अचानक दरड (Landslide) कोसळल्याने चार पर्यटक गंभीर जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड परिसरातील दहा पर्यटकांचा गट हरिश्चंद्रगडाची भटकंती करून परतीच्या मार्गावर होता. पावसाची रिमझिम सुरू असतानाच आडव्या कड्याच्या मागील बाजूस अचानक माती आणि दगडांचा मोठा भाग कोसळला. या घटनेत काही पर्यटकांच्या अंगावर दगड व माती पडली, तर दोन जण माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकले.



सुदैवाने, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या रेलिंगमुळे (सुरक्षा कठडा) मोठी जीवितहानी टळली. घटनेनंतर पर्यटकांसोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थ अमोल बादड यांनी तत्काळ गावकऱ्यांना तसेच वन विभागाला (Forest Department) माहिती दिली.


माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य (Rescue Operation) सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने माती व दगडाखाली अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमींना पायथ्याशी आणून उपचारासाठी (Treatment) राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाटेत १०८ रुग्णवाहिका (Ambulance) सेवेद्वारे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.


राजूर येथील डॉक्टर अभिनव लहामटे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार (First Aid) केल्यानंतर अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार चारही जखमींना नाशिक येथे पाठवण्यात आले आहे.


जखमी पर्यटकांची नावे रामप्रकाश यादव, निलेश गोमती विश्वकर्मा, कृष्णा कुमार साहू आणि दिनेश संजय साहू अशी आहेत. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.


घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) किशोर पवार, वनक्षेत्रपाल (Forest Ranger) दत्तात्रय पडवळ आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्याचा आढावा घेत जखमींना तातडीने नाशिकला हलविण्याची व्यवस्था केली.


हरिश्चंद्रगड परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असून पर्यटकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Vaishali Nagwade : अजितदादांच्या स्मृतींना राखी अर्पण; ‘तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू’ - वैशाली नागवडे

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा

Dr. Neelam Gorhe : गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मोक्का दाखल

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी

Tribal Hostel Age Limit Removed : आदिवासी वसतीगृहातील प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द

- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मुंबई : राज्यातील आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील प्रवेशासाठीची वयोमर्यादेची

Nanded Loha Child Case Pocso : नांदेड हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded News) लोहा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात वर्णी लागणार?

मुंबई : भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती असणाऱ्या संसदीय मंडळात लवकरच काही बदल केले

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला