Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी सरकारची जय्यत तयारी! पंढरपूरच्या विकासासाठी ६७१ कोटी; एअर ॲम्बुलन्सपासून CCTV पर्यंत सर्व सुविधा सज्ज

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत दर्शनासाठी राज्य सरकारने व्यापक नियोजन केले असून, पंढरपूरच्या विकासासाठी आतापर्यंत ६७१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यंदाच्या वारीत प्रथमच एअर ॲम्बुलन्स, अतिरिक्त रुग्णवाहिका, वाढीव एसटी बसेस, एनडीआरएफची तैनाती, सीसीटीव्ही देखरेख, वाहतूक व्यवस्थापन आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Ashadhi Wari 2026)


आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. (Ashadhi Wari 2026)



'वारीत कोणतीही कमतरता राहू देणार नाही'


यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा आत्मा आहे. लाखो वारकऱ्यांची सेवा हीच सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे नगरपरिषद, जिल्हा प्रशासन, आरोग्य, पोलीस, अग्निशमन, परिवहन, वीज, मंदिर समिती आणि इतर सर्व यंत्रणांनी एकाच टीमप्रमाणे समन्वयाने काम करावे." वारीनंतर प्रत्येक वारकऱ्याच्या तोंडी "यंदाचे नियोजन उत्कृष्ट होते" हेच शब्द असावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (Ashadhi Wari 2026)



६७१ कोटींच्या विकासकामांना मंजुरी :


पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने आतापर्यंत ६७१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी दिली आहे. या निधीतून रस्त्यांचे जाळे, पायाभूत सुविधा, दर्शन मंडप, वारकरी सुविधा केंद्रे आणि इतर विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच, अतिरिक्त निधीची आवश्यकता भासल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा. नगरविकास विभागाकडून आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Ashadhi Wari 2026)



प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा :


यंदाच्या वारीत आरोग्य सेवांवर विशेष भर देण्यात आला आहे. अतिरिक्त रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके, उपचार केंद्रे, वारकऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी एमएसआरडीसीलाही आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. (Ashadhi Wari 2026)



सुरक्षेसाठी बहुस्तरीय व्यवस्था :


वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, सीसीटीव्ही नेटवर्क, वाहतूक नियंत्रण, वीजपुरवठा आणि स्वच्छता यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहेत. याशिवाय पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका यांच्याकडूनही अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. (Ashadhi Wari 2026)



'पंढरीत व्हीआयपी कोणी नाही' :


यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "पंढरीत व्हीआयपी कोणी नाही. मी स्वतःही वारकरी म्हणून मुक्त दर्शन घेतले. प्रत्येक वारकऱ्याला सहज आणि सुलभ दर्शन मिळावे, हीच सरकारची भूमिका आहे." वारीचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने शेवटच्या क्षणापर्यंत सतर्क राहून काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. (Ashadhi Wari 2026)


या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार प्रा. ज्योती वाघमारे, आमदार तानाजी सावंत, समाधान अवताडे, राजू खरे, अभिजित पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Ashadhi Wari 2026)

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि