नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(nitish kumar) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर कुमार म्हणाले की ते आता भाजपची साथ सोडणार नाही. मोदींसोबतच्या आपल्या बैठकीनंतर कुमार यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. असे मानले जात आहे की या भेटीमध्ये संबंधित सरकार आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.
गेल्या महिन्यात विरोधी पक्षाची इंडिया गठबंधनची साथ सोडत ते एनडीएमध्ये सामील झाले. त्यानंतर भाजपसोबत मिळून बिहारमध्ये सरकार बनवल्यानंतर नितीश कुमार यांची मोदींशी झालेली ही पहिली भेट होती.
नितीश यांनी या भेटीनंतर सांगितले की त्यांनी दोन वेळा सोडले आहे मात्र आता ते असे कधी करणार नाही. आता कधीच नाही. आम्ही येथेच(एनडीए)राहणार. या दरम्यान त्यांनी २०१३मध्ये भाजपशी संबंध तोडण्याआधी, १९९५पासून भाजपसोबतच्या संबंधांना उजाळा दिला.
दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीआधी अनेक राजकीय मुद्द्यांना निकालात काढावे लागेल. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयूने बिहारमध्ये १७-१७ जागांवर निवडणूक लढवली होती.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…