मुंबई: गुजरातच्या जुनागढमध्ये प्रक्षोभक भाषण दिल्या प्रकरणी गुजरात एटीएसकडून रविवारी मुंबईचे इस्लाम अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक करण्यात आली. यादम्यान, त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. जुनागढ येथे काही दिवसांपूर्वी दिलेल्या भाषणात गुजरात पोलिसांनी मुस्लिम मौलाना आणि इतर दोन लोकांविरोधात एफआयआर दाखल केला होता.पोलिसांनी मुफ्ती सलमान अजहरी यांना ताब्यात घेतले.
मुफ्ती सलमान अजहरी यांना मुंबईच्या घाटकोपर स्टेशन येथे ठेवण्यात आले. यावेळेस पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मौलाना यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की मुफ्ती सलमान तपासात संपूर्ण मदत करण्यास तयार आहेत.
दिवसाच्या वेळेस मुफ्ती सलमान अजहरी यांचे सोशल मीडिया हँडलवरून अनेक ट्वीट्स करण्यात आले. यात एकामध्ये म्हटले त्यांना गुजरात एटीएस, मुंबई एटीएस आणि चिराग नगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ११.५६ वाजता ताब्यात घेतले.
दरम्यान, प्रक्षोभक भाषण प्रकरणात आपल्या समर्थकांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये असे अपील करताना मौलाना दिसले.
मौलाना यांच्यावर ३१ जानेवारीला जुनागढ येथील एका कार्यक्रमादरम्यान प्रक्षोभक भाषण दिले असा आरोप आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मुफ्ती सलमान, कार्यक्रमाचे आयोजन मोहम्मद युसुफ मलिक आणि अजीम हबीब ओडेदरा यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ बी आणि ५०५(२) अंतर्गत एफआयआर दाखल केला.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…