Rahul Kanal : आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करा, नाहीतर राजकारणातून राजीनामा द्या!

पक्ष सोडला तर चोर आणि सोबत असल्यावर मांडीवर घेऊन बसता का?


राहुल कनाल यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल


मुंबई : मुंबई महापालिकेच्या कोविड घोटाळ्यात (BMC Covid scam) काल ईडीकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची चौकशी करण्यात आली. यानंतर संजय राऊतांनी ठाकरे गट सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत सामील झालेल्या नेत्यांवर आरोप केले. अमेय घोले (Amey Ghole), वैभव थोरात, राहुल कनाल (Rahul Kanal) खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर शिवसेना युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल व अमेय घोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना खडे बोल सुनावले. 'आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करा, नाहीतर राजकारणातून राजीनामा द्या' असं ओपन चॅलेंज राहुल कनाल यांनी संजय राऊतांना दिलं आहे.


राहुल कनाल म्हणाले, खिचडी घोटाळा झाला आहे, त्यामध्ये ऑन रेकॉर्ड नावं आली आहेत. आमची नावं आली तर आम्ही दोघेही राजकारणाचा त्याग करायला तयार आहे. पक्ष सोडला तर चोर आणि सोबत असल्यावर का मांडीवर घेऊन बसता का? आरोप खोटे ठरल्यास राजीनामा देणार का ? असे सवाल यावेळी राहुल कनाल यांनी उपस्थित केले. यावेळी त्यांनी पुरावेही दाखवले. सुरु तुम्ही केलं, संपवणार मी, असंही यावेळी ते म्हणाले.


संजय राऊत ह्यांनी आमच्यावर खोटे आरोप केले आहेत, असं राहुल कनाल यांनी सांगितलं. फॅक्ट नसताना बोलणं योग्य नाही, कोणत्या प्रकारे आणि कोणत्या थराला जाऊन संजय राऊत साहेब बोलतायत. ते आमचे आदरणीय नेते होते आणि आहेत. काल त्यांनी जे वाक्य वापरलं की, सत्तेत असणाऱ्यांना चौकशी लागत नाही, असं म्हटलं तर मी सांगतो काही कारकुनांची २०२२ सालापासून चौकशी सुरु होती. माझ्यावर त्या काळात कोणतीही केस नाही. केवळ प्रेमापोटी मी एकनाथ शिंदे यांच्याकडे आलो आहे, असं राहुल कनाल म्हणाले.



महापौर बंगल्यावर बसून डील व्हायच्या


महापौर बंगल्याचे सीसीटीव्ही (cctv) बघा मग सर्वांना समजेल. सुनील बाळा कदम हा राऊत साहेबांचे दौरे बघायचा, तेव्हा महापौर बंगल्यावर बसून डील व्हायचे. तेव्हा राऊत कुणाला फोन करायचे? वरळीच्या हिल टॉप हॉटेलमध्ये कुठला कारकून काम करत होता? त्याचे सीसीटीव्ही पब्लिकमध्ये आणा, तो कारकून कोणाला भेटलेला हे त्यातून समजेल. पक्षाची वाताहत झालेली आहे याचे हेचं कारण आहे, असा हल्लाबोल कनाल यांनी केला.

Comments
Add Comment

प्रभादेवीतील साई सुंदर नगर आणि कामगार नगर दाेनमधील नाल्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी विकासकाची केली नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील प्रभादेवी येथील साई

पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्ग प्रवेश नियंत्रण प्रकल्पाचा पैसा वळवला रस्ते सिमेंट काँक्रिट कामांसाठी

रस्त्याचा निधी कमी पडल्याने तब्बल २५० कोटी रुपये करावे लागले वळते मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई

अतिरिक्त आयुक्त डॉ ढाकणे यांच्याकडे मालमत्ता विभागासह पर्यावरणाचीही जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी डॉ अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. डॉ

ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन... भाषणाची सुरुवात करताना लक्षात ठेवा 'हे' मुद्दे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. या

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्ण मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या