Arvind Kejriwal : ईडीकडून अरविंद केजरीवालांना पाचव्यांदा समन्स

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दारु घोटाळा प्रकरणी पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने केजरीवाल यांना पाचव्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. याआधीही दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवालांना चौकशीसाठी बोलावले होते. पण समन्स बजावण्याची कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.


केजरीवाल यांना १७ जानेवारी, ३ जानेवारी, २१ डिसेंबर आणि २ नोव्हेंबर रोजीही समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अरविंद केजरीवाल ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत.


अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठीच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून केला जात आहे. सत्ताधारी भाजप चौकशीसाठी बोलावून अटक करणार असल्याचे आम आदमी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. चौकशी करायची असेल तर प्रश्न लिहुन केजरीवालांकडे देऊ शकतात, असे आपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.


ईडीला पाठवलेल्या पत्रात केजरीवाल यांनी म्हटले की, प्रत्येक कायदेशीर समन्स स्वीकारण्यास तयार आहे, परंतु हे समन्स देखील ईडीने पूर्वी पाठवलेल्या समन्सप्रमाणेच बेकायदेशीर आहे. हे समन्स राजकीय हेतूने प्रेरित असून समन्स मागे घेण्याची मागणी केजरीवालांकडून करण्यात आली होती. तसेच मी माझे आयुष्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने जगलो. माझ्याकडे लपवण्यासारखे काही नसल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.


दरम्यान, दारु घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया आणि संजय सिंह तुरुंगात आहेत. आता या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवून आरोपी करण्याची तयारी आहे. मागील वर्षी आप नेते विजय नायर यांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

WhatsApp लॉगिन फेल, मेसेज मिळेनात! मेसेजिंग अॅपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कामं ठप्प

WhatsApp वेब वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. Downdetector या संकेतस्थळावर या

Yogi Adityanath : सिंगापूर - जापान दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी केले ₹९०,००० कोटींचे सामंजस्य करार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिंगापूर आणि जपानचा चार दिवसांचा दौरा पूर्ण केला. दोन्ही

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान