Raj Thackeray : भारतीय रेल्वे मंत्रालयात मराठी तरुण तरुणींना नोकरी मिळवून देण्यासाठी राज ठाकरे तत्पर

मनसैनिकांना केले 'हे' आवाहन


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मराठी लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी कायम आग्रही असतात. नुकतीच केंद्र सरकारने (Central government) रेल्वे भरती (Railway recruitment) जाहीर केली आहे. अनेक पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यात जास्तीत जास्त मराठी तरुण तरुणींना जागा मिळाव्यात, यासाठी राज ठाकरे यांनी एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत मनसैनिकांना आवाहन केले आहे. 'मराठी तरुण तरुणींना नोकरी मिळवून देण्यासाठी तत्पर राहा', असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


भारतीय रेल्वे विभाग 'सहाय्यक लोको पायलट'च्या विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण ५६९६ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वे लोको पायलट भारती २०२४साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून वृत्तपत्राद्वारे जाहिराती देखील देण्यात आल्या आहेत. यासाठी राज ठाकरे या भरतीसाठी तरुणांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे आवाहन राज्यातील मनसैनिकांना केले आहे.



राज ठाकरे यांची एक्स पोस्ट काय?


राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट IndianRailways.gov.in ला भेट द्यावी. उमेदवारांनी होमपेजवरील लोको पायलट भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करून अर्ज करावा, असं राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.




Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास