VIDEO : भाजपाने निवडणुकीसाठी लाँच केलेली जबरदस्त कँपेन थीम बघाच!

'सपने नहीं, हकीकत बुनते हैं। तभी तो सब मोदी को चुनते हैं।'


नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने आगामी (२०२४) लोकसभा निवडणुकीसाठी थीम साँग (campaign theme) लाँच (VIDEO) केले आहे. याला 'सपने नहीं, हकीकत बुनते हैं। तभी तो सब मोदी को चुनते हैं।' (Modi ko chunte hain) असे शीर्षक देण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये उज्ज्वला, डीबीटी, प्रत्येक घरात पाणी, प्रधानमंत्री आवास योजना तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणासह विविध गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.





युवा मतदारांसोबत बोलताना मोदी म्हणाले, 'स्थिर सरकार मोठे निर्णय घेत असते, आमच्या सरकारने अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले मुद्दे सोडवले. १०-१२ वर्षांपूर्वी जी स्थिती होती, त्यांनी देशातील युवा वर्गाचे भविष्य अंधकारमय केले.''


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्यूअल माध्यमाने युवा वर्गाला संबोधित केले. भूतकाळात भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या हेडलाइन असायच्या. आता चर्चा विश्वसनीयता आणि यशोगाथेच्या होत आहेत. तुमची स्वप्नं, माझा संकल्प आहे, ही मोदीची गॅरंटी आहे. आज देशातील तरुण मतदारांसोबत संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, नव तरुण आपल्या मताच्या माध्यमाने देशाची दिशा आणि दशा ठरवणार आहेत.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव