मुंबई : सध्या सर्वच राजकीय पक्षांनी (Political parties) लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) कंबर कसली आहे. याचवर्षी या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तारखांबाबत मात्र घोळ आहे. सोशल मीडियावर (Social Media) लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला घेतली जाणार असल्याचं निवडणूक आयोगाचं (Election commission) एक पत्र व्हायरल होत आहे. मात्र, दुसरीकडे निवडणूक आयोगाने हे वृत्त फेटाळलं आहे.
निवडणूक आयोगाच्या तयारीसाठी ही तात्पुरती तारीख आहे. निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख यांचा आराखडा ठरवण्यासाठी १६ एप्रिल ही तारीख ठरवण्यात आल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. निवडणूक १६ एप्रिलला होणार याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या सीईओनी ही पोस्ट केली आहे. पत्रात देण्यात आलेली तारीख संदर्भासाठी आहे बाकी काहीही नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दिल्लीच्या सीईओ कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ‘२०२४ लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख १६ एप्रिल आहे. मात्र हे स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की, जाहीर करण्यात आलेली तारीख ही निवडणूक आयोगाला आराखडा आणि योजनेच्या तयारीसाठी संदर्भ म्हणून जाहीर करण्यात आली होती. आत्तापर्यंत निवडणुकीचा आराखडा नक्की झालेला नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…