Rohan Bopanna : भारताचा टेनिस स्टार रोहन बोपण्णाने रचला इतिहास!

पुरुष दुहेरी स्पर्धेची उपांत्य फेरी तर गाठलीच, पण आणखी एका विक्रमावर कोरले नाव


मुंबई : भारताचा टेनिस (Tennis) स्टार रोहन बोपण्णाने (Rohan Bopanna) ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ च्या पुरुष दुहेरी स्पर्धेच्या (Men's doubles) उपांत्य फेरीत प्रवेश करताना ग्रँड स्लॅम इतिहास रचला. बोपण्णा आणि त्याचा साथीदार मॅथ्यू एबडेन (Matthew Ebden) यांनी बुधवारी मॅक्झिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी (Maximo Gonzalez and Andres Molteni) या अर्जेंटिनाच्या जोडीवर सरळ सेटमध्ये विजय मिळवून उपांत्य फेरी (Semifinales) गाठली. या विजयासोबतच त्यांनी आणखी एक विक्रम रचला आहे. रोहन आणि मॅट मेन्स डबल्समध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत.


ऑस्ट्रेलियन ओपनमधील उपांत्यपूर्व फेरीतील विजयामुळे वयाच्या ४३ व्या वर्षी बोपण्णा हा जगातील प्रथम क्रमांकाचा पुरुष दुहेरीचा खेळाडू बनला आहे. क्रमवारीनुसार तो ही उपांत्य फेरी गाठणारा इतिहासातील पहिल्या क्रमांकाचा सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरला आहे. याआधी ऑक्टोबर २०२२ मध्ये राजीव राम या ३८ वर्षीय अमेरिकन खेळाडूने हा विक्रम केला होता. तर रोहनचा साथीदार ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यूने या क्रमावारीत दुसरे स्थान पक्के केले आहे.


बोपण्णा १७ प्रयत्नांत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला. सामना सुरू झाल्यापासूनच बोपण्णा आणि मॅथ्यू यांनी विरोधी खेळाडूंना संधीच दिली नाही. ते मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांच्यावर अक्षरशः तुटून पडले. बोपण्णा आणि त्याच्या जोडीदाराने एक तास ४६ मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीत मॅक्झिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी या सहाव्या मानांकित अर्जेंटिनाच्या जोडीवर ६-४, ७-६, ७-५ असा सहज विजय नोंदवला आणि सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला.


याआधी रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार ऑस्ट्रेलियाचा मॅट एबडेन यांनी नेदरलँडच्या वेस्ली कूलहॉफ आणि क्रोएशियाच्या निकोला मेक्टिक या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या सीडेड जोडीनं कूलहॉफ आणि मेक्टिक या माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या जोडीचा ७-६, ७-६ असा पराभव केला. आता सेमीफायनल्सच्या सामन्यात रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांनी अर्जेंटिनाच्या मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांचा ६-४, ७-६, ७-५ असा पराभव केला आहे. यानंतर ही इंडो-ऑस्ट्रेलियन जोडी उपांत्य फेरीत बिगरमानांकित टॉमस मॅचॅक आणि झिझेन झांग यांच्याशी सामना करेल.

Comments
Add Comment

इराणमधील हिंसक आंदोलनात आतापर्यंत ५ हजार जणांचा मृत्यू

तेहरान(वृत्तसंस्था): इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे आतापर्यंत किमान पाच हजार जणांचा मृत्यू झाला

महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिकची भूमी...

महापालिका निवडणुकीतील यशाबद्दल ठिकठिकाणी अभिनंदन झ्युरिक :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक

भारताचा पाकिस्तानवर 'फार्मा' स्ट्राइक!

अफगाणिस्तानमध्ये भारतीय औषधांचा दबदबा काबुल : अफगाणिस्तानच्या फार्मा बाजारात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे.

भारताच्या मदतीने श्रीलंकेत तिसरा बेली ब्रिज पूर्ण

कँडी - नुवारा एलिया मार्ग खुला कोलंबो : श्रीलंकेत आलेल्या ‘दित्वाह’ वादळानंतर भारत सरकारकडून राबवण्यात येत

थायलंडमधील रेल्वेवर क्रेन कोसळल्याने २२ जणांचा मृत्यू

बँकॉक : थायलंडमध्ये एक अतिशय भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. थायलंडच्या ईशान्य प्रांतात एक अवजड क्रेन रेल्वेवर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन