फेब्रुवारीत चलो अयोध्या, रामलल्लाच्या दर्शनाला!

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अख्खे मंत्रिमंडळ देणार राम मंदिराला भेट


मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येतील राम मंदिराला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार २२ जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहिले नव्हते. ते आता मंत्रिमंडळाला सोबत घेऊन अयोध्येला जाणार आहेत.


गेल्या सोमवारी (दि.२२ जानेवारी) अभिजित मुहूर्तावर रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी ट्विट करत म्हटले होते.


एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यानंतर हा दौरा निश्चित केला जाईल. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा दौरा निश्चित असला तरी त्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५ फेब्रुवारी ही तारीख जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे, अख्खे मंत्रिमंडळ घेऊन रामलल्लाचे दर्शन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरू शकते.

Comments
Add Comment

Atul Save : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करणार- मंत्री अतुल सावे

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचा

"महाबीजची नवी उत्पादने शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग ठरतील" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली महाबीजचा नवा इतिहास; चार नाविन्यपूर्ण उत्पादनांची

Buldhana Shocking News : क्रूर बापाने पोटच्या लेकीचं शरीर कापलं अन् शिर धडावेगळे करत...बुलढाण्यात धक्कादायक प्रकार

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana News) उघडकीस आलेल्या एका हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला (Madhya Pradesh)

NEET paper leak : नीट' परीक्षा घोटाळ्याचे पुणे कनेक्शन उघड! ब्युटी पार्लरमध्ये मोठं जाळं ? महिलेला बेड्या; 'व्हॉट्सॲप चॅट्स' पोलिसांच्या हाती

पुणे : संपूर्ण देशात खळबळ माजवून देणाऱ्या 'नीट' (NEET) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यातही सापडले

Solapur News : सोलापुरात तब्बल २ कोटींच्या 'एमडी' ड्रग्जसह तस्करांची टोळी गजाआड!

सोलापूर : सोलापूर शहरात अमली पदार्थांचा विळखा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, शहर गुन्हे शाखेने एक अत्यंत धडक

NEET UG 2026 Paper Leak : मोबाईल बंद करून लपलेला संशयित अखेर CBI च्या जाळ्यात; NEET पेपरफुटी प्रकरणात अहिल्यानगरमधून संशयिताला घेतले ताब्यात

अहिल्यानगर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक मोठी