Atul Save : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करणार- मंत्री अतुल सावे

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे, याच पार्श्वभूमीवर भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.



श्री. सावे यांनी आज भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, अधीक्षक अभियंता बिपिन शिंदे, निलेश गिरमे, भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष अजय खेडेकर, पीएमपीएलचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत डोके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. सावे म्हणाले, क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती नागरिकांना व्हावी, याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत चर्चा करुन भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करुन कामाची सुरुवात करण्यात आली होती. सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्मारकाचे काम वेगाने सुरू असून सध्याची ९० टक्के काम पूर्ण झाले आहे, या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत उर्वरित विकास कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी श्री. सावे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


यावेळी श्री. नायर यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक विकास आराखड्याच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांबाबत माहिती दिली.


इमारतीची वैशिष्ट्ये आणि सुविधा: स्मारकामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित विविध आधुनिक सुविधा असणार असून यामध्ये ऑडिओ-व्हिडिओ शो, दोन्ही महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित 'थीम बेस्ड' ऑडिओ-व्हिडिओ शो आणि होलोग्राफीचे काम करण्यात येणार आहे. या दोन्ही महापुरुषांचे अर्धपुतळे आणि त्यांच्या कार्याची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. मुली आणि महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र, मार्गदर्शन केंद्र आणि संगणक केंद्र उभारले जाणार आहे. स्मारकात एक ॲम्फीथिएटर देखील असणार आहे.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी