Ahmednagar Accident : कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

  68

अहमदनगर : गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये (Accidents) प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच अहमदनगरमध्ये एक भीषण अपघाताची (Ahmednagar Accident) घटना घडली आहे. कल्याण-नगर महामार्गावर (Kalyan - Nagar highway) एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची एकत्रित धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. आज मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


पोलिसांनी या अपघातासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, कल्याण निर्मल महामार्गावर ऊस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांच्यात ढवळपुरी फाट्या जवळ मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार धडक झाली. यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे या ठिकाणच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता.


त्यानंतर तातडीने जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी