Shri Ram Pran Pratishtha: प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अयोध्येत पोहोचला विराट कोहली? एअरपोर्टवर दिसले कुंबळे

मुंबई: अयोध्येत सोमवारी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन होत आहे. यासाठी क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांना निमंत्रित कऱण्यात आले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मालाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. एका रिपोर्टनुसार विराट कोहली अयोध्येत पोहोचला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, रवींद्र जडेजा आणि अनिल कुंबळेही अयोध्येत पोहोचल्याचे वृत्त आहे. कुंबळे एअरपोर्टवर दिसले.

सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करण्यात आलेत. यात दावा केला जात आहे की कोहली अयोध्येत पोहोचला आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटर अनिल कुंबळेही अयोध्येत पोहोचले आहेत. वेंकटेश प्रसादही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी पोहोचले आहेत. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी मिताली राज, हरमनप्रीत कौर, महेंद्रसिंग धोनी आणि रवीचंद्रन अश्विन यांनाही बोलावण्यात आले आहे.

 



भारताची स्टार शटलर सायना नेहवालही अयोध्येत पोहोचली आहे. ती म्हणाले, माझे सौभाग्य असे की मला या कार्यक्रमात सामील होण्याची संधी मिळाली. आपण इतक्या वर्षानंतर जल्लोष साजरा करत आहोत. आता फक्त त्या क्षणांची प्रतीक्षा जेव्हा आम्ही श्री रामांचे दर्शन घेऊ.

भारत आणि इंग्लंड यांच्यात २५ जानेवारीपासून कसोटी मालिका खेळवली जात आहे. यासाठी टीम हैदराबाद येथे पोहोचली आहे. कोहलीही हैदराबादला गेला होते. तेथे त्याने सराव सत्रात भाग घेतला. यानंतर अयोध्येसाठी निघाला. कर्णधार रोहित शर्मानेही सराव सुरू केला.
Comments
Add Comment

Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली

RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

RR : राजस्थान रॉयल्सला पहिल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील

IPL 2026 : प्लेऑफसाठी विजय महत्त्वाचा!

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब आययपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्स यांच्यातील ६१ वा सामना

KKR : कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ!

कोलकाता : आयपीएल २०२६ स्पर्धेतील ६० व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. या सामन्यात गुजरात