नवी दिल्ली: अयोध्येत उद्या श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त दिल्ली सरकारद्वारे संचलित शाळा सोमवारी बंद राहतील. दरम्यान, संध्याकाळच्या सत्रातील शाळा दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होतील.
रविवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत दिल्लीच्या शिक्षण विभागाने सांगितले सामान्य आणि सकाळच्या सत्रात काम करणारे दिल्लीचे सर्व सरकारी आणि सहकारी सहाय्यता प्राप्त शाळा २२ जानेवारीला बंद राहतील. याआधी दिल्ली सरकारने सर्व कार्यालयांना अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली होती.
शनिवारी दिल्लीच्या उपराज्याल वीके सक्सेना यांनी अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त सर्व सरकारी कार्यालये, शहरी स्थानिक संस्थ्या, स्वायत्त संस्था, उपक्रम आणि मंडळांना अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर केली होती.
दिल्लीच्या प्रशासकीय सरकारी कार्यालयांना अर्ध्या दिवसाच्यासुट्टीसह मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा सरकारनेही अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. काही राज्यांनी तर या दिवशी दारू विक्री आणि खरेदीवरही बंदी घातली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आदेशानुसार गोव्यातही २२ जानेवारीला सार्वजिक सुट्टी जाहीर करण्यात आली आणि सरकारी कार्यालये आणि शाळा बंद राहतील. यातच त्रिपुरामध्ये राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान राज्यातील सर्व कार्यालये आणि शैक्षणिक संस्था दुपारी २.३० वाजेपर्यंत बंद राहतील.
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…