
नवी दिल्ली: २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची धूम संपूर्ण देशात आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे उद्घाटन कऱणार आहेत. तसेच ते यजमान म्हणून पुजा पाठ करतील. याआदी ते दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये जाऊन पुजा-अर्चा करत आहेत. याच क्रमाने रविवारी ते त्या ठिकाणी जातील जेथून रामसेतुची निर्मिती झाली.
पंतप्रधान मोदी आज सकाळी साडेनऊ वाजता अरिचल मुनाई पॉईंटचा दौरा करतील. याबाबत म्हटले जाते की येथून रामसेतुची निर्मिती झाली होती. यानंतर सकाळी सव्वा दहा वाजता ते कोठंडारा स्वामी मंदिरात पुजा आणि दर्शन करतील. कोठंडारामा नावाचा अर्थ धनुषधारी राम आहे.
काय आहे या जागेचे महत्त्व?
धनुषकोडीबद्दल असे म्हटले जाते की येथे विभीषण पहिल्यांदा श्रीरामांना भेटले होते. काही दंतकथाही हे सांगतात की हे तेच ठिकाण आहे जिथे श्री रामांनी विभीषणचा राज्याभिषेक केला होता.
याआधी शनिवारी पंतप्रधान मोदींनी भगवान रामनाथस्वामी मंदिरात पुजा अर्चना केली. असे म्हटले जाते की तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्याचील रामेश्वरम द्वीप स्थित शिव मंदिरांचा संबंध रामायणाशी आहे कारण या ठिकाणचे शिवलिंग श्रीरामांनी प्रस्थापित केले होते. यानंतर श्री रामांनी माता सीतेची प्रार्थना केली होती. पंतप्रधान मोदी रंगनाथन स्वामी मंदिरात जाणारे पहिले पंतप्रधान आहेत.
रुद्राक्षची माळा घातलेली पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी शनिवारी अग्नितीर्थ किनाऱ्यावर स्नान केल्यानंतर भगवान रामनाथस्वामी यांची पुजा केली. ते रुद्राक्ष माळा घातलेले पाहायला मिळाले.