Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीएकावेळी चारजण वापरू शकतात Airtel चा हा प्लान

एकावेळी चारजण वापरू शकतात Airtel चा हा प्लान

मुंबई: एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लान्सचा ऑप्शन मिळतो. कंपनीच्या पोस्टपेड प्लान्सच्या लिस्टमध्ये फॅमिली रिचार्जचा पर्यायही आहे.

कंपनीच्या फॅमिली प्लानच्या लिस्टमध्ये चार रिचार्ज सामील आहे. हे सर्व पोस्टपेड प्लान्स आहेत. सगळयात स्वस्त प्लान ५९९ रूपयांचा आहे. यात दोन सिम कार्डला अॅक्टिव्ह ठेवता येऊ शकते.

जर तुम्हाला चार लोकांसाठी एक प्लान घ्यायचा आहे तर यासाठी तुम्हाला ९९९ रूपयांचा रिचार्ज करावा लागेल. हा एअरटेलचा platinum family plan आहे.

यात मेन कनेक्शनशिवाय तीन अन्य कनेक्शन जोडली जाऊ शकतात. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग बेनेफिटसोबत येतो.

यात १९० जीबी महिन्याला डेटा मिळतो. या प्रायमरी युजरला १०० जीबी डेटा आणि प्रत्येक अॅड ऑन कनेक्शनला ३० जीबी डेटा मिळतो.

कंपनी डेटा रोलओव्हर करण्याची सुविधाही देते. युजर्स २०० जीबीर्यंत वाचलेला डेटा नंतर वापरू शकतात. याशिवाय युजर्सला १०० एसएमएसही मिळतात.

या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला amazon prime मेंबरशिपचा ६ महिन्यांचा फ्री अॅक्सेस मिळतो. याशिवाय कंपनी Disney+ Hotstar mobileचा एक वर्षांचा फ्री एक्सेस देत आहे.

यासोबतच कंपनी airtel xstream play चा अॅक्सेस आणि Wynk premium सबस्क्रिप्शन देते. हा प्लान त्या युजर्ससाठी चांगला पर्याय आहे जे चार लोकांच्या कनेक्शनसाठी रिचार्ज करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -