Nagpur News : शेकोटीसाठी लावलेल्या आगीत घर पेटलं! दोन चिमुकल्यांचा झाला मृत्यू

Share

घराबाहेर पळाल्याने मोठी बहीण बचावली

नागपूर : नागपुरात (Nagpur News) एक धक्कादायक आगीची घटना घडली. नागपूरच्या सेमिनरी हिल परिसरात गोविंद गोरखडे कॉम्प्लेक्स शेजारी एका घराला आग (Fire) लागली. आईबाबा घरात नसताना तीन मुलांनी थंडी वाजत असल्याने घरातच शेकोटी पेटवली. मात्र, या शेकोटीची आग पसरली आणि अख्खं घर जळालं. यात ७ वर्षांची मोठी बहीण घराबाहेर पळाल्याने बचावली. मात्र, दोन लहान भावंडांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. काल रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ज्यावेळी आग लागली त्यावेळी बहिणीने आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच रुग्णवाहिकेला देखील तातडीने बोलावण्यात आले. पण तोपर्यंत दोन्ही भावांचा भाजल्याने मृत्यू झाला होता.

घरातील लहान मुलांनी पेटवलेल्या शेकोटीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. झोपडीवजा घराला ही आग लागली. आगीच्या वेळी घरात दोन सिलेंडर होते. पण त्या सिलेंडरपर्यंत आग पोहचण्यापूर्वी अग्निशमन विभागाच्या पथकाला आग विझवण्यात यश आले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

नेमकं काय घडलं?

थंडी वाजत असल्याने घरातच या भावंडांनी शेकोटी पेटवली. त्यावेळी या मुलांचे वडील कामावर होते. तसेच मुलांची आई ही शेजाऱ्यांकडे कामानिमित्त गेली होती. घरात ही तीनच भावंडं असताना घराला आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे या मुलांची बहीण घाबरुन गेली आणि गोंधळून बाहेर आली. पण तिचे दोन्ही भाऊ मात्र घरामध्येच अडकले. या चिमुरड्यांना या आगीतून बाहेर देखील पडता आले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. देवांश उईके आणि प्रभास उईके अशी या दोघांची नावे आहेत.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

17 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

56 minutes ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago