नवी दिल्ली : २२ जानेवारीला दुपारी १२.३० ते एकच्या दरम्यान श्रीराम मंदिरात रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठीत केली जाणार आहे. हा मंगलमय सोहळा पाहता यावा यासाठी केंद्र सरकारच्या कर्मचार्यांकडून अर्धा दिवस सुट्टी मागण्यात आली होती. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांची ही मागणी अखेर मान्य झाली आहे.
२२ जानेवारीला दुपारी २.३० पर्यंत सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठान देशभर बंद राहणार आहेत.