पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

  57

राज्यातील ३० हजार ५०० कोटींच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, आणि पायाभरणी पंतप्रधान करणार



अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन



पंतप्रधान करणार २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन


नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पंतप्रधानांचे दुपारी १२:१५ च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत. नवी मुंबई येथे दुपारी ४:१५ च्या सुमारास, पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील.या कार्यक्रमात ते विविध विकासकामांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील.


अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू


नागरिकांसाठी शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतुक सुविधा अधिक बळकट करून 'सुलभ गतिशीलतेला' चालना देणे, पंतप्रधानांचे ध्येय आहे. या अनुषंगाने मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) बांधण्यात आला असून त्याचे नाव आता 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे. या पुलाची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्याच हस्ते डिसेंबर २०१६ मध्ये झाली होती. अटल सेतू, एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधण्यात आला आहे. सुमारे 21.8 किमी लांबीचा 6 पदरी हा पूल असून समुद्रावर तो सुमारे 16.5 किमी लांबीचा तर जमिनीवर सुमारे 5.5 किमी लांबीचा आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे, तसेच देशातील सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार असून मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतासाठी प्रवासाच्या वेळेतदेखील बचत होणार आहे. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर दरम्यानच्या वाहतुक व्यवस्थेत ही सुधारणा होणार आहे.


नवी मुंबई येथे सार्वजनिक कार्यक्रम


आज होणाऱ्य पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्या निमित्त ८ लोकार्पण कार्यक्रम मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. यात सिडकोचे २, भारतीय रेल्वे यांचे २, एम एम आर डी ए यांचे ४ व मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान यांच्या हस्ते पार पडणार आहे. कोकण विभागातील २६ प्रमुख अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली असून,या समिती करीता जिल्हाधिकारी रायगड यांना नोडल अधिकारी म्हणून शासनाने घोषित केले आहे. या महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रमाकरीता विविध ठिकाणाहून सुमारे एक लाखांहून अधिक महिला उपस्थित आहेत. या महिलांकरीता त्यांच्या राहत्या ठिकाणापासून कार्यक्रम स्थळापर्यंतच्या सेवासुविधा, तात्पुरते शौचालयाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वाहनांसाठी पार्किंग, प्रवेशव्दार, विविध ठिकाणांहून नवी मुंबईला जोडणारे रस्ते अशा मूलभूत सेवा सुविधांसाठी आवश्यक साधन सामग्री बाबतचा नियोजन करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर, रुग्णवाहिका, आवश्यक औषधांचा पुरवठा तैनात ठेवण्यात येणार आहे. त्याच बरोबर दीड लाख लोक बस्तीला असा भव्य दिव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलिस थाफा, एन एस जी जमंडो रॅपिड एक्षण फोर्स, आर फी एफ त्यानात करण्यात आली आहे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पाच जिल्ह्यातील वाहतूक पोलीस पनवेल नवी मुंबई व कार्यक्रमाच्या ठिकाणी सज्ज झाली आहे

Comments
Add Comment

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक