Chhatrapati Sambhaji Nagar : खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू!

छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तर, अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी घाटी दवाखान्यात पाठवले.


बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय १२ वर्षे), अफरोज जावेद शेख (वय १२ वर्षे), जावेद शेख (वय १२ वर्षे), अबरार जावेद शेख (वय १२ वर्षे) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांची नावं आहेत. खेळण्यासाठी आलेली काही मुलं तलावात बुडाली असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावात दिली. सोबतच तहसीलदार देखील घटनास्थळी पोहचले. त्यांनतर अग्निशमन दलाने पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढले, मात्र चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.



नेमकं काय झालं?


काल ११ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संबंधित मुलं खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. मात्र, सायंकाळ होऊन देखील ती परतली नाहीत. मुलं घरी का परत आली नाहीत म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. मुलांचा रांजणगाव शेणपुंजी परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला. दरम्यान, मुलांचा शोध घेत काही नातेवाईक तलावाजवळ पोहोचले. यावेळी त्यांना तलावालगत अफरोज, अबरार तसेच इतर दोन मुलांचे कपडे दिसून आले. त्यामुळे मुले तलावात बुडाल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी ताबडतोब वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावातल्यांना मदतीसाठी बोलावले. शोधकार्यानंतर मुलांचे मृतदेह मिळून आले. ते पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यामुळे घटनास्थळी आणि गावात शोककळा पसरल्याचे पाहायला मिळाले.



Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी