Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीUnseasonal rain : अवकाळी पावसाने आणली शेतक-यांवर संक्रांत

Unseasonal rain : अवकाळी पावसाने आणली शेतक-यांवर संक्रांत

कांदा, हरभरा पीकावर परिणाम तर गव्हाचे पीक झाले आडवे

संतोष टेमक

शनिशिंगणापुर : ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) कांदा, हरभरा व गहु पिकांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या आठवडाभरापासुन ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा, तुडतुडे, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे.

अतिवृष्टी, गारपीट व अवेळी आलेल्या पावसामुळे शेतीचे तंत्र बिघडत असल्यामुळे एकप्रकारे शेतक-यांवर संक्रांत आल्याने शेतक-यांमध्ये नैराश्य दिसून येत आहे. एकीकडे खते, बियाणे, औषधे, मशागतीचे वाढलेले दर आणि दुसरीकडे शेतमालांचे पडलेले दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

नेवासा तालुक्यातील नेवासा, करजगाव, पानेगाव, सोनई, खरवंडी, हिंगोणी, भेंडा, कुकाणा, चांदा, वडाळा आदी परिसरात वा-यासह अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

“मोठ्या जिकरीने व पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेला गहु अवकाळीने पुर्णपणे झोपला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पीक विमाही काढलेला असुन पंचनामा करून पुर्ण भरपाई द्यावी.” – शरद सोनवणे, शेतकरी, हिंगोणी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -