Eknath Shinde : हेलिकॉप्टरमधून फोटो काढण्यापेक्षा शेती केलेली केव्हाही चांगले

Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

हिंगोली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पूर्ण केले. राम मंदिरासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रित केले. परंतु त्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला, अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने आघाडी केली, असेही नमूद करत सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर यांना पोटशुळ का? पोटदुखी का? हेलिकॉप्टरमधून फोटो काढण्यापेक्षा हेलिकॉप्टरने शेती केलेली केव्हाही चांगली आहे. आम्ही फेसबुक लाईव्हने नाही तर लोकांकडे जाऊन त्यांचे काम करत आहोत. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसैनिकांना ताटकळत ठेवले. आज वर्षा बंगला सर्वांसाठी खुला आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

हिंगोलीतील (Hingoli) शिवसंकल्प अभियान सभा बुधवारी (दि.१०) पार पडली. यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला देखील न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत. काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला बळी पडायचे नाही. लोकांच्या सुख-दु:खात धावून जाणारा मुख्यमंत्री आहे. मला काय मिळेल यापेक्षा राज्याला काय मिळेल, याचा मी जास्त विचार केला. धनुष्यबाण आपल्या सोबत आहे. बाळासाहेबांचा विचार आपल्या सोबत आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना ताठकळत ठेवले. आज वर्षा बंगला सर्वांसाठी खुला आहे. या राज्यात सध्या विकासाला चालना मिळत आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वी राज्याला मागे नेण्याचे काम सुरु होते. हा एकनाथ शिंदे आयुष्यातील प्रत्येक क्षण महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च करणार आहे. मी घरात बसून उंटावरुन शेळ्या राखणारा नेता नाही, अशी टीकाही शिंदेंनी ठाकरेंविरोधात केली.

मी सामान्य कार्यकर्ता म्हणून आज काम करत आहे. माझ्या राज्यातील नागरिकांवरचे संकट मला दूर करायचे आहे. मला फक्त प्रेम कमवायचंय. हेलीकॉप्टरने शेती करतो म्हणून टीका केली जाते. हेलीकॉप्टरने जाऊन शेती करणे चांगलेच आहे. माझी नाळ शेतीशी जुळलेली आहे. मी नेहमी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आपली भूमिका बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांची भूमिका आहे. आपला सर्वांचा संकल्प म्हणजे राज्याचा सर्वांगीण विकास हाच आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही सर्व नियम बाजूला ठेवतो. आम्ही आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार देतोय. माताभगिनींसाठी एसटीचे तिकीट निम्मे केले. ज्येष्ठांना देखील मोफत प्रवास सुरु केला, असेही शिंदे म्हणाले.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

13 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

41 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago