Devendra Fadnavis : सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही!

आमदार अपात्रतेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला


मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी लावलेल्या निकालानंतर ठाकरे गटाच्या (Thackeray group) तोंडचे पाणी पळाले आहे. सरकार २०२३ मध्येच पडणार अशी भाषा करणारे या निकालामुळे चांगलेच आपटले आहेत. आताच्या सरकारचा सतत घटनाबाह्य असा उल्लेख करत ठाकरे गटाच्या नेत्यांनी वारंवार सरकारच्या स्थैर्याबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र, यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. 'सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही! सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणारच', असं ते म्हणाले आहेत.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते. त्यामुळेच हे सरकार मजबूत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात म्हटले आहे की, सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही.


पुढे ते म्हणाले, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होते. आज विधानसभा अध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला देत जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही. मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.


Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Suicide : "तुमच्या पुढच्या सात पिढ्या यातना भोगतील..." मृत आईच्या त्या शेवटच्या शापाने उघडकीस आले कौटुंबिक वादाचे सत्य?

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण

Pune Accident : क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! पुण्यात बसमधून खाली पडल्याने तरुणीचा दुर्दैवी अंत; 'त्या' एका चुकीमुळे गेला जीव?

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. धावत्या पीएमपीएमएल बसमधून अचानक तोल जाऊन खाली

Chhatrapati Sambhaji : देवा...किती किळसवाणा प्रकार! पप्पांनी कचोरी आणली अन् त्यात उंदराच्या लेंड्या; ५ पैकी २ कचोऱ्या मुलांनी खाल्ल्याने नागरिकांत संताप

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर शहरात (Vaijapur Area) अन्नाची अवहेलना आणि ग्राहकांच्या

PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ