नवी दिल्ली: पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लक्षद्वीप (Lakshadweep) दौऱ्यानंतर मालदीव (Maldives)च्या मंत्र्यांनी केलेल्या अपमानजनक ट्वीटनंतर झालेल्या वादादरम्यान केवळ ५ दिवसांतच लक्षद्वीपला जाणाऱ्या सर्व फ्लाईट्स मार्चपर्यंत बुक झाल्या आहेत.
देशातील आणखी एक पर्यटन स्थळ असलेल्या लक्षद्वीपला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आयलँडचा दौरा केला होता. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर लक्षद्वीपचे गुगल सर्च वाढले होते. अनेक ट्रॅव्हल एजन्सीमध्येही लक्षद्वीपबाबतची चौकशी वाढली होती.
लक्षद्वीपसाठी केवळ एक एअरलाईन कंपनी अलायन्स एअर फ्लाईट चालवते. ही कंपनी केरळच्या कोची आणि लक्षद्वीपच्या अहत्तीद्वीप यांदरम्यान एअर सर्व्हिस चालवते. कोचीवरून अगत्तीला जाण्यासाठी एक तास तीन मिनिटांचा वेळ लागतो. एका मीडिया रिपोर्टनुसार ही कंपनी कोची आणि लक्षद्वीपल यांच्यात दररोज ७० ते ७२ सीट असलेल्या एटीआर ७२ विमानाला चालवण्याचे काम करते. कोच्ची-अगत्ती फ्लाईटचे मार्चपर्यंत तिकीच विकले आहेत.
लक्षद्वीपचा मुद्दा समोर आल्यानंतर याबद्दलची चर्चाही वाढली आहे. दरम्यान, तज्ञांच्या मते इतक्या वेगाने वाढणाऱ्या गर्दीला सांभाळताना लक्षद्वीपचा कमकुवत ढाचा सक्षम नाहीये. एकदा मोठ्या संख्येने लोक लक्षद्वीपला पोहोचल्यास तेथे अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे.