Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका मार्चआधीच जाहीर होणार!

Share

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) कधी जाहीर होणार याबाबत कोणीही निश्चित सांगत नसून अनेकजण वेगवेगळ्या तारखा सांगत आहेत. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ नये यासाठी ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक संदर्भातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सर्व बदल्या पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने यासंदर्भात तसे पत्रच राज्य सरकारला पाठवले आहे. यामुळे देशात मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम लागू केला जाण्याची शक्यता आहे.

अनेक पक्षांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजप महायुती आणि इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे देशभरात लोकसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आलेला पाहायला मिळत आहे.

देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये आले आहे. निवडणुकांच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोग राज्यांच्या दौऱ्याना प्रारंभ केला आहे. आयोग सर्व प्रथम आंध्र प्रदेश व तामिळनाडूचा दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

Recent Posts

मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली; पण खरंच अतिक्रमण झालेल्या मुंबईतील ११ तलावांचे पुनरुज्जीवन होईल?

मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…

1 hour ago

Rajeshwari Kharat Religion : फॅण्ड्री फेम ‘शालू’ने धर्म बदलून केला ‘या’ धर्माचा स्वीकार!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…

1 hour ago

धक्कादायक! हा अपघात की अनास्थेचा मृत्यू? उन्हाळी शिबिरांची जबाबदारी नक्की कोण घेणार? आणि मृत्यूचे मोल कोण मोजणार?

जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…

2 hours ago

चर्चकडून पगार न घेणारे, पाच लक्झरी कारसह १३७ कोटींच्या संपत्तीचे मालक होते पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…

2 hours ago

Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पाचव्यांदा पर्यटकांवर हल्ला!

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…

2 hours ago

पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…

2 hours ago