मुंबई : देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.राज्यात सोमवारी ६१ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ७० रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. राज्यात रिकव्हरी रेट ९८.१७ टक्के नोंदवण्यात आला आहे, तर मृत्यूचे प्रमाण १.८१ टक्के आहे.
राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रूग्ण पुण्यात सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन उघड झाले आहे.
सोमवारी महाराष्ट्रात एकूण २,७२८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १,४३९ आरटीपीसीआर तर १,३०५ आरएटी चाचण्यांचा समावेश आहे. राज्यात २५० रुग्णांना जे. १ या नवीन कोरोनाच्या व्हेरियंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंट असलेल्या जे१ चे एकूण ६८२ रुग्ण होते. ६ जानेवारीपर्यंत देशभरातील १२राज्यात कोरोना नवीन व्हेरियंटच्या जे.१ चे रुग्ण असल्याचं स्पष्ट झाले. राज्यात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
यात कर्नाटक ११९, केरळ १८४, महाराष्ट्र १३९, गोवा ४७, गुजरात ३६, आंध्रप्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ३०, तामिळनाडू २६, नवी दिल्ली २१, ओडिशा ३, तेलंगाणा २ आणि हरियाणात १ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर पुण्यात नवीन कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे.