Tuesday, July 16, 2024
Homeक्राईमआई नव्हे ही तर कैदासिन! मुलगा वडिलांना भेटू नये म्हणून पोटच्या ४...

आई नव्हे ही तर कैदासिन! मुलगा वडिलांना भेटू नये म्हणून पोटच्या ४ वर्षीय मुलाची केली गळा चिरून हत्या

पणजी : मुलगा वडिलांना भेटू नये, म्हणूनच एका स्टार्टअप कंपनीची सीईओ असलेल्या कैदासिन महिलेने आपल्या पोटच्या ४ वर्षीय मुलाची हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सूचना सेठ असे आरोपीचे नाव आहे. सूचना बंगळुरुमधील एका स्टार्टअपमध्ये सीईओ आहे.

सूचनाने गोव्यातील एका हॉटेलमध्ये मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह एका बॅगेत ठेवला होता. याप्रकरणी पोलिसांनी सूचनाला अटक केली आहे.

२०१० मध्ये सूचनाचे लग्न झाले होते. २०१९ मध्ये त्यांना मुलगा झाला. २०२० मध्ये काही कारणांनी सूचना आणि तिच्या नवऱ्याचा घटस्फोट झाला. यावेळी मुलगा दर रविवारी आपल्या वडिलांना भेटेल, असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु सूचनाला हे मान्य नव्हते. त्यामुळे पतीला मुलापासून वेगळे ठेवण्यासाठी तिने हा टोकाचा निर्णय घेतला.

गोव्याला फिरण्यासाठी आलेल्या सूचनाने धारदार शस्त्राने मुलाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका बॅगेत ठेवला. कोणालाही संशय होऊ नये म्हणून सूचनाने हॉटेलचा रुम स्वच्छ केला. त्यानंतर ती हॉटेलमधून चेकआऊट करुन निघाली. त्यावेळी हॉटेल स्टाफने तुमचा मुलगा कुठे आहे, असे विचारले. तेव्हा मुलगा आधीच गेल्याचे तिने सांगितले.

एका टॅक्सीत बसून सूचना निघून गेली. परंतु, सूचनाच्या या वागण्याचा हॉटेल स्टाफला संशय आला. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रुममध्ये जाऊन चेक केले. तेव्हा त्यांना खोलीत रक्ताचे डाग दिसले. हॉटेलच्या मॅनेजरने तातडीने पोलिसांना फोन केला.

याप्रकरणी गोवा पोलिसांनी तपास घेण्यास सुरुवात केली. सूचना ज्या टॅक्सीतून गेली होती. त्या टॅक्सीचा नंबर मिळवला. पोलिसांना टॅक्सीचालकाला फोन करुन कारमध्ये मॅडम आहेत का? अशी विचारणा केली. त्यावेळी सूचना टॅक्सीतच होती. मात्र तेव्हा ती कर्नाटकातील चित्रदुर्ग भागात पोहचली होती. त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरुन टॅक्सी चालकाने सूचनाला जवळच्या पोलीस ठाण्यात सोडले. गोवा पोलिसांनी चित्रदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सूचनाला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने आपल्या मुलाला भेटू नये असे सूचनाला वाटत होते. परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे तिला काहीच करता येत नव्हते. त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले आणि आपल्या मुलाची हत्या केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -