Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेला काळीमा! आठ महिला पोलिसांवर तीन वरिष्ठांकडून अत्याचार

घटनेचे व्हिडीओ बनवले, गर्भपात करण्यास भाग पाडले; भयंकर प्रकाराने पोलीस दल हादरलं


मुंबई : पोलीस म्हणजे समाजाचे रक्षक. समाजात होत असलेल्या गुन्हेगारीला रोखणं हे पोलिसांचं पहिलं कर्तव्य असतं. पण हेच पोलीस गुन्हेगार झाले तर? मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातून असाच एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या घटनेने अख्खं पोलीस दल हादरलं आहे. मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांनी तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी अनेक दिवसांपासून त्यांच्यावर बलात्कार (Rape) करत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.


धक्कादायक बाब म्हणजे, शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ देखील या अधिकाऱ्यांनी बनवल्याचा आरोप महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. एवढंच नाहीतर एक महिला पोलीस कर्मचारी गरोदर राहिल्यानंतर त्यांना जबरदस्तीने गर्भपात (Abortion) करण्यास देखील भाग पाडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे.


महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार करणारं पत्र पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. आपल्या तक्रार अर्जात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगितली आहे तसेच या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते