मुंबई : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत तब्बल ७.६ अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याने ते भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest person in India and Asia) बनले आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींना (Mukesh Ambani) मागे टाकले आहे. अदानींमुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अंबानी थेट १२ वरुन १३व्या स्थानावर गेले आहेत तर आता अदानींनी बारावे स्थान मिळवले आहे.
ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, गुरुवारपर्यंत अदानी अब्जाधीशांच्या यादीत १४व्या क्रमांकावर होते. मात्र गेल्या २४ तासांत त्यांनी केलेल्या प्रचंड कमाईमुळे त्यांच्या नेट वर्थमध्ये चांगली वाढ झाली आहे. ते आता १४व्या स्थानावरून १२व्या स्थानावर पोहोचले आहेत. ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ९७.६ अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे. मुकेश अंबानींची संपत्ती ९७ अब्ज डॉलर्स आहे. गेल्या २४ तासांत त्याची एकूण संपत्ती ६६५ दशलक्षने वाढली आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…