Sunday, May 11, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Loksabha Elections : लोकसभेसाठी महायुती सज्ज; संक्रांतीच्या आदल्या दिवसापासून राज्यभर मेळावे

Loksabha Elections : लोकसभेसाठी महायुती सज्ज; संक्रांतीच्या आदल्या दिवसापासून राज्यभर मेळावे

मुंबई : यंदाच्या वर्षात होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Elections) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीने (Mahayuti) देखील आपला विजय पक्का करण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी तिन्ही पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. महायुतीच्या पुढील मेळाव्यांबद्दल या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.


राज्यभरात महायुतीचे मेळावे घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ जानेवारीपासून राज्यात मेळावे घेतले जातील, अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली.


येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यादृष्टीने रणशिंग फुंकण्यात आलं आहे. महायुती लोकसभेच्या ४५ जागा जिंकेल असा दावा नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यासाठीच १४ जानेवारीपासून मेळावे सुरु करण्यात येणार आहेत. फेब्रुवारीमध्ये मेळावे संपवण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.


तीन पक्ष एकत्रपणे निवडणुकाला सामोरे जाणार आहोत. सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. जानेवारीमध्ये जिल्हा आणि गाव पातळीवर मेळाव्यांचे आयोजन केले जाईल. फेब्रुवारीमध्ये विभागस्तरावर मेळावे होतील. फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या नेतृत्वात मेळावे होतील, अशी माहिती चंद्रशेखर बानवकुळे यांनी दिली.

Comments
Add Comment