Saturday, July 20, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकसरकारी धोरणाच्या निषेधार्ह बागलाणच्या शेतकऱ्यांचा गांजा लागवडीचा प्रयत्न

सरकारी धोरणाच्या निषेधार्ह बागलाणच्या शेतकऱ्यांचा गांजा लागवडीचा प्रयत्न

जायखेडा पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

वटार : काल शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून गांजा लागवड करण्याचा निर्णय घेणारे आंदोलन छेडले.

जिल्हाउपाध्यक्ष शैलेंद्र आबा कापडनीस यांनी या संदर्भात शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट करतांना म्हटले आहे की, कुठल्याच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्यात केंद्र व राज्य सरकार अयशस्वी ठरत आहे. शेतकरी अन्यायाविरुद्ध लोकप्रतिनिधी देखील लक्ष केंद्रित करत नसल्याने नाईलाज म्हणून शेतकऱ्यांना हे पाऊल उचलणे भाग पडत आहे.

शेतकरी गांजा लागवडीचा आंदोलनात्मक प्रयत्न करीत असतांना जायखेडा पोलिसांनी अशा पद्धतीने लागवड करता येत नाही, हा कायद्याने गुन्हा असून सदर लागवड थांबवावी अशी सूचना केली. त्यावर सरकार अचानक निर्यात बंदी सारखे निर्णय घेऊन दर पाडते. त्यावेळी कुठल्याही शेतकऱ्यांची परवानगी घेत नाही. विचारपुस करत नाही. शेतकऱ्यांनी वाढते खताचे,कीटनाशक,बुरशी नाशक, तसेच शेती उपयोगी वस्तुंचे दर या अशा महागाईच्या खाईत कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकरी वर्गाने उपस्थित केला.

या प्रसंगी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. पुरुषोत्तम शिरसाठ यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्यात शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष शैलेंद्र आबा कापडणीस, बागलाण तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी, बाळासाहेब शेवाळे, माणिक निकम, भिका सुर्यवंशी, भास्कर बागुल, महेंद्र जाधव, ज्ञानेशवर जाधव, यशवंत गुंजाळ ज्ञाने आणि परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -