नवी दिल्ली: केंद्र सरकारने सोमवारी गँगस्टर गोल्डी ब्रारला बेकायदा कृत्यविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत ( यूएपीए ) दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले की गोल्डी ब्रारचे प्रतिबंधित खलिस्तानी संघटनेचे खालसाशी संबंध आहेत. तसेच सीमेच्या पलीकडील दहशतवादी एजन्सीचे समर्थन या संघटनेला मिळते. तसेच ते अनेक हत्यांमध्ये सामील आहेत.
नोटीसमध्ये म्हटले आहे की ब्रार राष्ट्रवादी नेत्यांना धमकीचे कॉल करणे, खंडणी मागणे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हत्याचे दावांचे पोस्ट करणे सामील होते.
हत्यारांच्या तस्करीमध्ये सामील होते गोल्डी ब्रार
गृह मंत्रालयाने सांगितले की गोल्डी ब्रार सीमेच्या पलीकडून ड्रोनच्या माध्यमातून आधुनिक हत्यारे, दारूगोळा आणि विस्फोटक साहित्याच्या तस्करीमध्ये सामील होता. तो अशा प्रकारची कामे करण्यासाठी ही हत्यारे शार्प शूटरला सप्लाय करत होते.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येची घेतली होती जबाबदारी
कॅनडा स्थित दहशतवादीने २०२२मध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. विशेष म्हणजे मे २०२२मध्ये पंजाबच्या मनसा जिल्ह्यात गोळी घालत हत्या केली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या काही दिवसांनी इंटरपोलने जून २०२२मध्ये गोल्डी ब्रारच्या प्रत्यार्पणासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
कोण आहे गोल्डी ब्रार?
मूळचचा पंजाबच्या श्रीमुक्तसर साहिब येथे राहणाऱ्या गोल्डी ब्रारचा जन्म १९९४मध्ये झाला होता. तो विद्यार्थी व्हिसाच्या सहाय्याने कॅनडाला पळून गेला होता. तेथून तो गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील होता.